Mukund Karnik

My blogs

About me

Gender Male
Industry Engineering
Location Dubai, United Arab Emirates
Introduction मी मुकुंद संतुराम कर्णिक, सध्या वास्तव्य दुबई (संयुक्त अरब अमिराती)मध्ये, पण जन्माने महाराष्ट्रातील कोल्हापूरचा. माझ्या विषयी आणखी थोडं सांगायचं तर मी स्थापत्यशास्त्रातील पदवीधर आहे. माझे हात दगडाधोंड्यांमध्ये, सिमेंटवाळूमध्ये असले तरी मन लेखनामध्ये आहे. मी आजवर कवि, कथालेखक, लघुकादंबरीकार, समर्थांच्या मनोबोधावरील भाष्यकार, श्रीमद्भगवद्गीतेचे मराठीत श्लोकबध्द रुपांतर करणारा अशा विविध भूमिकांमधून साहित्याच्या प्रांगणात वावरलो. माझ्या साहित्यकृतींची यादी पुढे देतो. १. श्रीमद्भगवद्गीतेचे मराठीत श्लोकबध्द रुपांतर आणि मनोबोधावरील निरूपणे (हे दोन्ही 'महाद्वार' या माझ्या ब्लॉगवर आहेत.) २. बनुताई आणि बंटीबाबा हा बालकवितासंग्रह ३. चार महिन्यांची रात्र - कथासंग्रह (हे दोन्ही ई-पुस्तक या रूपात आहेत) ४. हाऊ'ज दॅट? ही लघुकादंबरी (पुस्तक रूपात) ५. 'मी-अनुवादक' या ब्लॉगमध्ये मी इंग्रजीतून मराठीत रुपांतरित केलेल्या कथा देत असतो. ६. मना सज्जना - मनाच्या श्लोकांवरील निरूपणे