nayana

My blogs

About me

Gender Female
Industry Education
Location Pune, Maharasthtra, India
Introduction नमस्कार!मी मुळची धुळ्याची.आता ही जन्मगावाबद्दलची कृतज्ञता म्हणा किंवा मातीची ओढ! खान्देशातल्या ज्या अहिराणी भाषेचा गोडवा खुद्द पु.लं.नीही गायलाय ती लुप्त होऊ नये म्हणुन हा ब्लॉगप्रपंच! माझं गाव धुळे,उत्तर महाराष्ट्रातलं दुर्लक्षित जिल्हा. तसं पाहिलं तर धुळ्याजवळुन ३ राष्ट्रीय महामार्ग जातात. पण भरपुर ऊन, पाण्याचे सतत टंचाई इ. गोष्टींमुळे सरकारच्या नजरेबाहेर. शिक्षणात अग्रेसर असल्याने तिकडची मुले-मुली पुणे-मुंबईला प्राधान्य देतात. जुनी पिढी हळुहळु मागे पडत चाललीय. तशीच तिथली भाषाही. माझी आजी नेहमी म्हणायची की मी जीवंत आहे तोवर मला जी अहिराणी गाणी, ओव्या, अभंग येतात तेवढे लिहुन घे" ! पण त्यावेळेस तेवढी समज नसल्याने म्हणा किंवा दुर्लक्षण्याने म्हणा... हा अहिराणी गाण्यांचा खजिना दृष्टीआड राहिला.तो पुन्हा एकदा जगासमोर मांडावा ही इच्छा मनी धरुन हा ब्लॉग सुरु केलाय. धन्यवाद!