कोकण मेवा!

My blogs

About me

Gender Female
Location रत्नागिरी, India
Introduction मी तशी सर्वसामान्य मध्यमवर्गीय! कोकणातल्या अपंग पण स्वाभिमानी अशा एका शेतकय्राच्या घरात जन्म घेण्याचे भाग्य लाभले आणि माझ्या कोकणानेच मला खूप काही दिले! माझे बाबा स्वतः एक हात असूनही उत्तम स्वयंपाक करीत. त्यांनीच कोकणातले अनेक खास पदार्थ शिकवल्रे मला! माझ्यातल्या सुगरणीला फुलवण्याचे काम त्यांचेच. निसर्गाने भरभरून दिलेल्या कोकण प्रदेशातच सासर मिळाल्याने कोकणाशी असलेले नाते अधिक दृढ झाले. सासरच्या एकत्र कुटूंबात १४ माणसांच्या गोकुळात असलेल्या चोखंदळ खवय्यांमुळे माझ्यातल्या सुगरणीचा चांगलाच कस लागला. अनेकदा पदार्थ चुकल्याने बोलणीही खाल्ली, पण परत चार दिवस गेले की नविन प्रयोग करण्याचा सपाटा चालूच राहिला. जो पदार्थ १४ माणसांमध्ये मताधिक्याने आवडला त्याचे प्रमाण लिहून ठेवत गेले. आज त्याच योग्य पाक़क्रुती आपल्यासाठी घेऊन आलेय. यात मुख्य कोकणात पिकणाय्रा वस्तूंचा समावेश असला तरीही इतर अनेक वेगळ्या आणि पारंपारीक चविष्ट पाककृतीही आहेत. तर मग घ्या आमच्या कोकणमेव्याचा आस्वाद, खा आणि खिलवा!