असा हा एक(ची)नाथ !

My blogs

About me

Gender Male
Industry Government
Occupation Service
Location नवीन पनवेल, महाराष्ट्र, India
Introduction मी आहे तरी कसा या प्रश्नाचे उत्तर मलाच सापड्त नाही ! मन मनास उमगत नाही ! गेली अनेक वर्ष हा आत्मशोध चालू आहे, माझ्यातला "मी"च मी शोधत आहे ! मी कधी बंडखोर असतो, कधी शेळपट, कधी आग्रही कधी दूराग्रही, कधी कुटूंबवत्स्लल, कधी सर्वसंग परीत्याग करून हिमालयात जाणारा, कधी मित्रात रमणारा, कधी सर्वांशी फटकून वागणारा, कधी आँर्कुट वर थिल्लर पणा करणारा, कधी गंभीर विषयाला हात घालणारा ? का प्रवाहाबरोबर वाहवत जाणारा प्रवाहपतित, की नवे प्रवाह शोधणारा द्रष्टा ? एकाच वेळी कमालीचा धार्मिक व दगडातला देव नाकारणारा मी खरा ? समाजसेवेचे वेड असलेल्या वडिलांना स्वत्:पुरते बघा म्हणून सांगणारा व त्याचवेळी "बुडते हे जन, न देखवे डोळा" हे उमगणारा मी खरा ? एक मात्र खरे, जीवन नौका भरकटत आहे, पण खडकावर आपटून फूट्ली नाही की गाळात रूतली नाही ! वडीलांची पुण्याई, विनोदाची जाण, संस्कार, संघाच्या मुशीत काही काळ हे मडके भाजले गेले आहे हे ही खरेच !
Interests बुद्धीबळ, भटकंती, चेंडूफळी, छायाचित्रण (स्थिर), गिर्यारोहण, ब्राह्मण संघटन अजून बरंच काही !
Favorite Movies श्यामची आई, सीमा, कराटे पट, बाँण्ड पट, जैत रे जैत, शापित, जगाच्या पाठीवर असे आणि या पठडीतले !
Favorite Music मराठी भावगीते, भक्तीगीते, अभंग, हिंदीत रफी, आशा, लता, किशोर यांनी गायलेली गाणी !
Favorite Books स्वामी, पानिपत, गोट्या, महानायक, तुंबाडचे खोत, वपुंची व पुलंची सर्व पुस्तके !

टोपण नाव काय ?