नितीन निमकर

My blogs

About me

Gender Male
Industry Science
Occupation शिक्षण,गुंतवणूक
Location मुंबई, महाराष्ट्र, India
Introduction मी एक संगणक वापरणारा आणि संगणकावर मनापासून प्रेम करणारा आहे. हे सगळ मी मराठीतून लिहितो आहे म्हणजे मला मराठी आणि संगणक याची फारच आवड आहे. माझ्या कंपनीच्या मुळे माझा संगणकाशी परिचय झाला आणि माझे जीवनच बद्लून गेले. सुदैवाने माझे बॉसही माझ्याच पठडीतले. मग काय विचारता आम्ही दोघे मिळून 1993/1995 पासून संगणकाशी दोस्ती मस्ती आणि प्रेम करु लागलो. मायक्रोसॉफ्ट बेसिक, फॉक्सप्रो, नंतर विंडोज 95 आल्यावर व्हिज्युअल बेसिक, मायक्रोसॉफ़्टॅ ऍक्सेस, वर्ड मधील व्ही बी ए, एस्केल मधील व्ही बी ए आदी वापरुन आमच्या ऑफिस मधल्या गरजा पुर्‍या करु लागलो. असे करता करताच आम्ही काही कंपन्यांची सॉफ़्टवेअर बनवण्याची कामे घेऊ लागलो. काही काळा नंतर मला काही स्वयंसेवी संस्थांसाठी ईलर्निंग सॉफ़्टवेअर बनवण्याची संधी मिळाली. ईथेच मला मराठी आणि संगणक यांची सांगड घालायची संधी मिळाली. विंडोज 2000 मधे युनिकोड आल्यावर मी त्याचा वापर जास्तित जास्त करण्याचा प्रयत्न करु लागलो. असा एकूण माझा संगणक आणि मराठीचा प्रवास सुरु झाला.