Blogger
dsitaram
On Blogger since: March 2011
Profile views: 1,320

My blogs

About me

Occupationनोकरी
Locationपुणे, महाराष्ट्र, India
Introductionमी दत्तात्रय सिताराम माळी. मी मुळचा पातोंडे ता. चाळीसगावचा. माझे शिक्षण बी एस्सी (पदार्थ विज्ञान). लहानपणापासुनच भगवंताची उपासना सुरु. आईचे याबाबत माझ्यावर विशेष संस्कार, तिने मला जगाच्या नश्वरते विषयी पहिला अभंग शिकवला, नको नको मना गुंतु माया जाळी।काळ आला जवळी ग्रासावया।। या तुकोबांच्या अभंगाचा प्रभाव माझ्या जीवनात खोलवर पडल्यामुळे मी जगात उदासिन वृत्तीने वागु लागलो. पांडुरंगाची ओढ मनाला लागल्यामुळे एकप्रकारची विरक्ती बाणली गेली, माझे वडिल प पु सिताराम बाजीराव माळी हे स्थितप्रज्ञ असल्यामुळे त्यांचा देखील प्रभाव माझ्यावर झाला, माझ्या वडिलांना कोणत्याही मानसिक विकारांनी छळले नाही. जन्मभर विरक्त व समाधानी वृत्ती,अशा विरक्तांच्या सहवासात मी घडत गेलो. शिक्षण पुर्ण केले. माझ्या स्वभावाची अशी घडण झाली असल्यामुळे काही वेळेस मला मित्र,नातेवाईकांचा पण त्रास झाला. माझे लग्न झाले. मला एक मुलगा व एक मुलगी आहे. कटुंब पुण्याला रहात आहे. माझी दोघी मुलं संगित शिकत आहेत. मुलगा तबला शिकतो तो ललित कला केंद्र पुणे येथे शिकत आहे. व मुलगी पेटी, बासरी, व्हायलिन शिकते आहे. मी रायगड जिल्ह्यात नागोठणे येथील रिलायंस पेट्रोकेमिकल्स या कंपनीत विस वर्ष कामाला होतो. सध्या सौदीत एका पेट्रोकेमिकल्स कंपनीत काम करीत आहे.
Favorite moviesसंत तुकाराम,शामची आई, दादा कोंडकेंचे सर्व चित्रपट, श्वास,
Favorite musicश्रीनिवास खळे,आर डी बर्मन
Favorite booksयोगवाशिष्ठ, अमृतानुभव,ज्ञानेश्वरी, वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण,भागवत पुराण, एकनाथी भागवत, माझी जन्मठेप,शामची आई,गीतारहस्य,वास्तव रामायण (डॅा.प.वि. वर्तक) वेदसुत्रे,तुकाराम गाथा.
Google apps
Main menu