Blogger
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा
On Blogger since: November 2019
Profile views: 231

My blogs

About me

IndustryEducation
OccupationSchool of Schedule tribe caste FasePardhi
LocationAt. Mangrur chavhala Ta. Nandgaon khandelwal Dist. Amravati, Amravati, Maharashtra, India
Introductionकचरा-भंगार गोळा करणारी, भीक मागून, शिकार करून खाणारी, अगदी पाकीटमारी-चोऱ्या करणारी मुलं आता शाळेत धडे गिरवताना दिसतात. काही मुलं दहावी झाली. ती मोठ्या पदावरच्या नोकरीचं स्वप्न बघत आहेत. या मुलांनी हे स्वप्न पाहावं,यापेक्षा मोठा बदल कुठला असू शकतो ? शैक्षणिक, सामाजिक आण‌ि आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या समाजाला कोठेही छोटे-मोठे गुन्हे घडल्यास पोलिस सर्वातप्रथम लक्ष्य करतात. मात्र याच समाजातील एक युवक पदवीधर झालाच, परंतु थेट शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देत स्वतःच्या फासेपारथी समाजाच्या मुलांसाठी ‘प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा’ सुरू करत पिढी घडवण्याचे काम केले. या शाळेत सध्या ४७२ विद्यार्थी शिकत आहेत. हा थक्क करणारा प्रवास गाठला आहे तो मतीन भोसले यांनी. मतीन भोसले हे या मुलांसारखाच फासेपारधी समाजातला. चोर’! - मूल जन्माला आल्यावर त्याला लावलं जाणारं फासेपारधी समाजातलं विशेषण स्वत:सह या मुलांवरील गुन्हेगारीचा टिळा पुसून काढण्यासाठी तो जिवाचं रान करत आहे .स्वतः जवळचं होतं-नव्हतं ते सगळं विकून प्रसंगी भीक मागून तो या मुलांच्या शिक्षणासाठी, पोटा-पाण्यासाठी झटत आहे.
Google apps
Main menu