Blogger
तुषार नातू
On Blogger since: May 2011
Profile views: 778

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
Locationनागपूर ., महाराष्ट्र , India
Introductionतारुण्यात सळसळता उत्साह आणि नवे नवे अनुभव घेण्याची ओढ या मुळे कधीतरी येणारी निराशा या निराशेच्या भरात चुकलेला मार्ग , पुढे असंख्य अनुभव , यातना , भोग यांचा संघर्ष .दारू , चरस , गांजा , भांग ,ताडी अफू आणि शेवटी ब्राऊन शुगर च्या व्यसनात जीवनाची सुमारे २५ वर्षे वाया घालविल्यानंतर आलेल्या शहाणपणाचा इतरांना लाभ करून देण्याच्या उद्देशाने हा ब्लॉग सुरु केला आहे . मी जात ,धर्म , देश यांच्या सीमा ओलांडून विश्व या संकल्पनेवर विश्वास ठेवतो तसेच सर्वोच्च अश्या नैसर्गिक शक्तीला शरण जाण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो .परम ईश्वर ही संकल्पना मला मान्य आहे या सर्व विश्वात कार्यरत असलेल्या त्या परम शक्तीला दंडवत. विज्ञान जेथे संपते तेथूनच अध्यात्माची सुरवात होते हे सत्य मी बुद्धीच्या निकषावर तावून सुलाखून स्वीकारले आहे , पृथ्वी , अग्नी , जल , वायू आणि आकाश या पाच महान तत्वानी बनलेले माझे शरीर नेहमी मानवतेच्या प्रसारासाठी वापरण्याचा निर्धार केलाय .माझ्या सारख्या बंडखोर तरुणांनी आपली उर्जा , बुद्धिमत्ता माझ्यासारखी उधळू नये म्हणून हा खटाटोप .
Interestsवाचन , गायन , अभिनय , कविता , सामाजिक कार्य , अध्यात्मिक चर्चा .
Favorite moviesचित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर त्यातून समाजातील समस्यांवर लोकांचे लक्ष वेधण्याचे साधन आहे . त्यामुळे सामाजिक समस्यांची सोडवणूक करण्याचा विचार देणारे , तसेच मानवतेचा संदेश देणारे , मानवी भावविश्व उलगडून दाखवत त्यातून सकारात्मक बदलाची प्रेरणा देणारे सर्वच चित्रपट आवडतात .
Favorite musicभजने , भक्तिगीते , भावगीते
Favorite booksश्रीमान योगी , स्वामी , मृत्युंजय , छावा , बलुत , उचल्या , कोल्ह्याटयाच पोर , दुनियादारी , मुंबई दिनांक ,चिरागनगरची भुते , पँपिलॉन ,माझे विद्यापीठ , ज्वाला आणि फुले , आनंदवनाचा कर्मयोगी , समिधा ,व्यक्ती आणि वल्ली , अपूर्वाई , पूर्वरंग , बटाट्याची चाल . सांग सखे , कोसला , जरीला , ७२ मैल , पानिपत , आणि इतर संख्य ज्यांनी माझा दृष्टीकोन समृद्ध होण्यास हातभार लावला आहे .
Google apps
Main menu