प्रमोद रावते

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Government
Occupation महाऑनलाईन डेटा एन्ट्री ऑपरेटर
Location तुमसर , महाराष्ट्र , India
Introduction राम राम मंडळी, मी काही असा लेखक वगैरे लोकांपैकी नाहीये. सहज म्हणून ब्लॉग बनवून पहिला. मजा आली कि च्यामारी आपली स्वतःची वेबसाईटचं असते ब्लॉग म्हणजे! मग विचार केला कि स्वताच्या मालकीची जागा आहे म्हणल्यावर आपण काहीही कारस्थान करू शकतो. आता चाललंय आपले कारस्थान. स्वतः आपल्या मनातील लिहायचं,कधी काही दुसऱ्यांचे लेख पसंत पडले तर द्यायचे ढापून(अर्थात ज्यांचे क्रेडीट त्याला देऊन,वांग्मय चौर्यकर्म आम्ही कधीही करणार नाही,अश्या चोरांचा आम्हाला भयंकर म्हणजे भयंकरच राग येतो.) असो, आता थोडे स्वतःबद्दल सांगतो, मी एका लहानश्या खेडेगावातील युवक आहे. लहान म्हणजे जेमतेम १३०० लोकसंख्येचा गाव. चारही बाजूंनी सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी. आजू बाजूंनी जंगलांनी व्यापलेला. गावाला वेढा घालून गेलेली एक बोडी (लहानसा नाला म्हणा हवे तर). गावातील प्रत्येक घरी थोडीफार का होईना पण स्वताच्या मालकीची हक्काची जमीन आहे. तांदळाची शेती हा मुख्य व्यवसाय सोबतीला पशुपालन ओघाने आलेच हे वेगळे सांगायला नको. गावात शिक्षणाच्या नावाने बोंबा जरी नसल्या तरी बोटावर मोजण्यालायाकच पदवीधर लोक. १०वि ,१२वि शिकणारे आहेत थोडेफार. पुढे भेट होत राहणारच,म्हणून आता थांबतो. राम राम
Interests वाचन आणि लिखाण माझे छंद आहेत. तसेच डब्लू डब्लू ई आणि क्रिकेट पाहायला मला भयंकर आवडतात.
Favorite Movies चित्रपट तसे कमीच पाहतो. मात्र विदेशी श्रेणीतील चित्रपट पाहायला खूप आवडतात, विशेष करून त्यात वापरल्या गेलेले तंत्रज्ञानाची मज्जा काही औरच असते.
Favorite Music धार्मिक गाणी खूप आवडतात. विशेषकरून दुर्गा मातेचे भजन. आजच्या युगातील डी.जे. म्हणतात ते देखील थोड्या फार प्रमाणात आवडतात. आणि सायलेंट म्युझिक पण आवडतात.
Favorite Books ययाती, कादंबरीमय शिवकाल वाचल्यानंतर कुठलीही कादंबरी तेव्ह्डी खास वाटत नाही आता.