प्रसाद

My blogs

About me

Location चिंचवड, महाराष्ट्र
Introduction गड्यांनो !!! पूर्वजन्मार्जित संचित किंवा काकणभर अधिक पुण्याईच असावी, जो हा जन्म मला सह्याद्रीच्या अगदी कुशीतच मिळाला. सह्याद्रीवर प्रेम करणारं आणि मलाही ते संस्कार देणारं घर मिळालं. सह्याद्रीप्रेमाचं ते बीज माझ्या हृदयी वाचनाचं खतपाणी मिळून छान रुजलं. सह्याद्रीवर जीव ओवाळून टाकायला शिकवणारे आप्पा उर्फ दुर्गमहर्षी गोनिदां, पुरंदरे, घाणेकर, बेडेकर असे अनेक गुरूवर्य लाभले. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडताना साथसंगत करणारे भाऊबंद भेटत गेले. वाढत्या वयाबरोबर सह्याद्रीवरचं प्रेमही घट्ट होत गेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सह्याद्री नावाच्या त्या अबोल तपस्व्यानेही मला अखंड मायाच लावली. मला सांगा सद्भाग्य म्हणजे तरी अजून काय वेगळं असतं हो? पण तरीही समाधान पावेल तो मनुष्य कसला? तेव्हा हे सह्य पर्वता !! असंच दिवसागणिक तुझी निखळ माया, कणखरपणा, स्थैर्य, वैराग्य माझ्या अंगी भिनू दे !! एक दिवस ह्या देहाची मातीही तुझ्याच अंगणात पसरून आणि आत्म्याची प्राणज्योतही तुझ्याच कातळ हृदयात सामावून मला तुझ्याशी एकरूप करून घे !! आणि पुढला प्रत्येक जन्म, मग भले तो जन्म एखाद्या कीटकाचा, पाखराचा, गोनिदांनी चितारलेल्या रूखाचा वा माचीवरल्या बुधाचा, अगदी कसलाही असो, पण तो तुझ्या कुशीतच होऊ दे आणि माझ्यातल्या आत्मारामाला मोक्ष लाभेपर्यंत ह्या जन्मीच्या ॠणानुबंधांची पुनरावृत्ती अखंड होत राहू दे !!!