jagdishmore

My blogs

About me

Gender Male
Occupation PR/ Media
Location Mumbai, Maharashtra
Introduction अमळनेर (जि. जळगाव) येथील प्रताप महाविद्यालयात बीए करीत असताना ‘लोकमत’चा महाविद्यालयीन प्रतिनिधी होतो. 1996 मध्ये बीए झालो आणि पुणे येथील रानडे इन्स्टिट्यूट गाठलं. तिथं बीसीजे, एमसीजे केलं. यू.जी.सी.ची 'सेट'ही उत्तीर्ण झालो. अलीकडेच मुंबई विद्यापीठातून पीएचडी पदवीही संपादन केली आहे. पुण्यात शिकत असताना ‘केसरी’त अर्धवेळ उपसंपादक म्हणून संधी मिळाली. नंतर पुण्यातच ‘सकाळ’मध्ये रुजू झालो. पुण्याहून सुरू झालेला ‘सकाळ’मधील प्रवास नाशिक, भुसावळ आणि धुळेमार्गे मुंबईत संपला. ‘युवा सकाळ” व ‘ॲग्रोवन’साठीही वार्तांकन केलं. राज्य शासनाचा ‘दादासाहेब पोतनीस उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2003’ आणि ‘यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार- 2004’ प्राप्त झाला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात 2006 मध्ये सहायक संचालक (माहिती) म्हणून रूजू झालो. मंत्रालयात विविध मंत्र्यांकडे संपर्क अधिकारी म्हणून काम करता आलं. उपमुंख्यमंत्र्यांचा जनसंपर्क अधिकारी म्हणूनही संधी मिळाली. सातारा येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले. सध्या राज्य निवडणूक आयोगात सहायक आयुक्त (ज.सं.) या पदावर कार्यरत आहे. ‘राज्य निवडणूक आयोग: रौप्यमहोत्सवी वाटचाल’, ‘ट्वेंटी फाईव्ह इयर्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन’, ‘ग्रामपंचायत सदस्य मार्गदर्शिका’, ‘ग्लोबल वॉर्मिंग: खरे काय, खोटे काय’ इ. पुस्तकांचे लेखन- संपादनही केले आहे.
Interests Reading, Writing