sureshnaik

My blogs

About me

Gender MALE
Location panaji, goa
Introduction सुरेश सखाराम नाईक (गोवा) पत्रकार, लेखक. साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात सतत कार्यरत. "गोमन्तक'च्या निवासी संपादकपदासह "गोमन्तक' आणि "सकाळ'मध्ये वीस वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव. गोमंतक साहित्य सेवक मंडळ या साहित्यविषयक कार्य करणाऱ्या संस्थेचे 2004 पासून अध्यक्ष. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य. कला अकादमी, गोवा या संस्थेच्या जनरल कौन्सिलचे आणि साहित्यविषयक उपसमितीचे सदस्य. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य. गोमंतक मराठी अकादमीचे सदस्य आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून 15 वर्षे कार्य केले आहे. अकादमीच्या "मैत्र' या मासिकांच्या अनेक अंकासाठी संपादनसाह्य केले आहे. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या "साहित्य सेवक' या त्रैमासिकाचे व सध्याच्या वार्षिकाचे संपादक आहेत. मंडळाच्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनांच्या ,अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या व अन्य अनेक साहित्यिक कार्यक्रमांच्या आयोजनात सतत सहभाग. गोव्याच्या मराठी राजभाषा आंदोलनाचा प्रारंभ करणाऱ्यांपैकी एक. मराठी राजभाषा प्रस्थापन समितीचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही काम केले आहे. ठसे (निबंध) रस्ता (कथासंग्रह) पुस्तके प्रसिद्ध. "ठसे'साठी गोमंतक मराठी अकादमीचे प्रकाशनार्थ अर्थसाह्य आणि "रस्ता' कथासंग्रहाला गोमंत विद्या निकेतनचा द्वितीय पुरस्कार लाभला आहे.