माहेर

My blogs

About me

Introduction माहेरवाशिणीचे घराघरांत जपले जाणारे माहेरपण साहित्यविश्‍वातून ‘माहेर’ने जपले. गेली ५० वर्षे दर महिन्याला नित्यनेमाने भेटीला येणार्‍या ‘माहेर’ने मराठी स्त्री पृथ्वीतलावर ज्या ज्या ठिकाणी पोचली तिथे जाऊन तिची ‘माहेरा’बद्दल असलेली भावना हळुवारपणाने जपली. पन्नाशी पार करीत असताना स्त्रीच्या रोजच्या आयुष्यातील सर्व प्रकारची स्थित्यंतरं ‘माहेर’ जवळून पाहते आहे. गेल्या पन्नास वर्षांत जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत झालेले बदल आणि पुढच्या काही वर्षांत होणारे बदल, या प्रवासात स्त्रीचे अंगण पार बदलून जाणार आहे. स्त्रीचे जीवन एका रेषेत चालणारे राहिलेले नाही आणि पुढे त्याच्यात आणखी वळणे प्रत्येक पावलावर असणार आहेत. मूल जन्माला घालण्यासाठीही स्त्रीची आवश्यकता राहणार नाही इथपर्यंत स्त्री अस्तित्वासमोर आव्हाने उभी राहणार आहेत, राहत आहेत. तिचा कौटुंबिकच नव्हे तर सर्व प्रकारचा भवताल बदलतो आहे. या बदलाचे सारे वारे ‘माहेर’च्या अंकांमधून यापुढे दिसू लागतील.