अजित

My blogs

About me

Gender Male
Occupation जुनी माणसं म्हणायची,एखाद्याला कोणतंच काम जमत नसेल तर त्याला प्राथमिक शिक्षक बनवा.म्हणून मी 'प्राथमिक शिक्षक'.
Location India
Introduction माझं नाव अजित लोमटे. नाव भारदस्त वाटत नसलं तरी माझं व्यक्तिमत्व जबरदस्त आहे.मी खूप म्हणजे खूपच महान आहे.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या अंगात नाना कला, नाना कळा, नाना गुण, अगदी ना - ना म्हणेतोपर्यंत ठासून भरले आहेत. सगळं कसं ना ! ना ! असा यच्चयावत कलागुणांनी आणि इतर कलाकौशल्यांनी मी इतका संपृक्त, परिपूर्ण आहे की ज्याचं नाव म्हणजे मी ! पण मग मी कीर्तिवंत, धनवंत, गुणवंत म्हणून नावाजला का गेलो नाही ? हा तुम्हाला प्रश्न पडला असेलच. तर अगोदरच सांगतो ,इतरांच्या पोटावर पाय देवून पुढ जाणं माझ्या तत्वात बसत नाही.माझी उंची पाच फूट साडेसहा इंच. वर्ण गव्हाळ, माझा चष्मा तेजस्वी आहे, त्यामुळे त्याच्या मागील डोळ्यांचे तेज झाकलं जातं. माझे कान मध्यम साईजचे, पण त्यावर, वरच्या बाजूला म्हणजे कानाच्या वरच्या बाजूला केस आहेत. मला विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर जसे की, भारताच्या घसरत्या GDP वर,भारत- पाकिस्तान संबंधावर चौफेर चर्चा करायला खूप आवडते.मी बायकोसोबत वरील विषयावर गहन विचारमंथन नेहमीच करत असतो,अति झाल्यावर बायको दळणाचा डब्बा घेवून गिरणीत पाठवते.तिच्या बुद्धीमत्तेस माझे विचार जड जातात हे मी सहज समजून घेतो....आणि म्हणूनच माझ्या विचारांना मोकळी वाट करून देण्यासाठी आणि बौद्धिक समस्तर असणाऱ्या वाचक,लेखकांसोबत विचारमंथन करण्यासाठी मी ‘टाकबोरू’ वर आलो आहे.अपेक्षा आहे सहन कराल.
Interests चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे आणि फिटनेस फ्रीक.
Favorite Movies सर्व प्रकारचे, दर्जाहीन पासून दर्जेदार पर्यंत.