Dr Chandrhas Shastri
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Education |
| Location | PUNE, Maharashtra, India |
| Introduction | अमृताची फळे अमृताची वेली । ते चि पूढे चाली बीजाची ही || या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे, ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर हे विसाव्या शतकातील थोर संत वै. श्रीगुरू भगवानशास्त्री महाराज सोनपेठकर यांचा वारसा समर्थपणे चालवीत आहेत. आधुनिक संस्कृतकवी डॉ. सोनपेठकर यांनी २००० हून अधिक संस्कृत श्लोकरचना केल्या आहेत. शास्त्रीजींचे पूर्ण नाव डॉ. चंद्रहास दुर्गादासशास्त्री सोनपेठकर असे आहे. शास्त्रीजींचे लौकिक शिक्षण एम. ए. संस्कृत (स्वा.रा.ती.म.विद्यापीठ सर्वप्रथम), एम.एड. सेट संस्कृत, सेट व नेट शिक्षणशास्त्र, पीएच. डी. (उपनिषद) असे झालेले आहे. संस्कृत अध्ययनातील प्रावीण्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाने सन्मान केलेला आहे. तसेच परभणीचे माननीय आमदार डॉ. राहुल पाटील यांनी त्यांना परभणी रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे. |

